Monday, July 11, 2011

पंढरीचे द्वारी उभा क्षणभरी

पंढरीचे द्वारी उभा क्षणभरी ... अनुभव घेतला आज .....खरोखरच  नशिबाने सकाळी office ला जाता जाता tv वर विठ्ठलाची महापूजा बघायला मिळाली.. घाई घाईत निघालेली मी खांद्याची  Purse खाली ठेऊन विठ्ठला कडे बघत राहिले... पुजरयांचे  ते .. पय स्नानं  समर्पयामि.. दधि स्नान समर्पयामि .. कुमकुम लेपनं .. आणि सगळ्या मंत्रोचाराची शोडोप्षारे पूजा.. खूप प्रसन्न वाटल. आणि मस्त स्नान झाल्यावर नंतर विठ्ठल मूर्ती कित्ती गोड दिसते ना .. नेहेमीप्रमाणे माझ्या डोळ्यातनं पाणी आल
... माहिती नाही का .. पण खूप भरून येत मला विठ्ठला कडे पाहिल्यावर.. आज हि तेच.. आणि एक सुखी माणूस पण दिसतो मला आषाढी एकादशी च्या पूजेला.. शाशकीय पूजेला मुख्यामान्र्यांबरोबर पूजेचा मान मिळालेला वारकरी... पंढरीची वारी सार्थक झाल्याच आनंद असतो दोघाच्या चेहेऱ्या वर ... well  विठू माउली आपल्या पाठीशी नेहेमी उभी असावी हीच प्रार्थना ... बोला पुंडलिक वरदे.. हारी विठ्ठल ..